नवी देहली : गोवंश हत्याबंदीवर आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांनी मासांहारासाठी पशूंच्या कत्तली सहन केल्या जाणार नाही, असे सांगत गोमांस सेवनाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी- विक्रीवर घातलेल्या निर्बंधाचे त्यांनी समर्थन केले.
जनावरांच्या हत्येवर बंदी आणण्याचे कारण गुरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण कोणी काय खावे, यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. तसेच यासाठी कोणताही नियमही नाही. गोहत्याबंदी ही केवळ भारतात नाही तर क्यूबा या देशातही लागू आहे. त्या देशातही गुरांच्या हत्येवर बंदी घालण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तामिळनाडू राज्यात यापूर्वी ८५ प्रकारचे गुरे होती. मात्र आता फक्त दोन प्रकारची गुरे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संदर्भ : लोकसत्ता