Menu Close

भाग्यनगर येथील धर्मांधाने तलाक देऊन पत्नीला विकले !

मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलने करणार्‍या महिला संघटना कधी मुसलमान महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन करत नाहीत, हे लक्षात घ्या !  संपादक, दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर (तेलंगण) : ‘जावयाने माझ्या मुलीला दूरभाषवरून तलाक देऊन सौदी अरेबियामधील एका व्यक्तीला विकले’, अशी माहिती पीडितेच्या आईने एका चलचित्राद्वारे पराराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली असून जावयाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

माझ्या मुलीला तलाक द्यायचा असल्यामुळेच जावयाने तिला रियाध येथे पाठवले. ती तेथे पोहोचल्यानंतर तिला तलाक दिला आणि एका शेख व्यक्तीला विकले, असे पीडितेच्या आईने सांगितले. सायरा बानू असेे पीडितेचे नाव आहे. सायरा बानू हिला मस्कत आणि दुबई मार्गे सौदी अरेबिया येथे नेण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, सायरा बानू हिच्या पतीने येथील महिलांची तस्करी करणार्‍या दलालांना संपर्क केला होता. या दलालांनी सायरा बानू हिला दुबईचा १ मासाचा व्हिसा उपलब्ध करून दिला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *