पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी निषेध करणार नाहीत, हेही तितकेच खरे !
नवी देहली : कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे. (भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांवर ज्या प्रकारे अनुपम खेर शाब्दिक प्रहार करत आहेत, आमीर खान, शाहरूख खान यांचा ढोंगी सर्वधर्मसमभाव उघड करत आहेत, जिहादी आतंकवाद्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार जगासमोर मांडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पाकच्या कृतीचे कुणालाच आश्चर्य वाटणार नाही ! या घटनेनंतर साहित्यिक पाकच्या या असहिष्णुतेवरून पुरस्कार परत करतील का, हे पहावे लागेल ! – संपादक)
पाकिस्तानमधील अधिकार्यांनी अनुपम खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नसल्याचे म्हटले आहे. अनुपम खेर यांना दुसर्यांदा पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. मात्र या संदर्भात अनुपम खेर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला. खेर यांनी पाकिस्तान शासनाच्या कार्यालयाशी या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे सादर केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात