Menu Close

पोलिसांकडे तक्रार दिल्यावर धर्मांधांकडून डॉ. लंबे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, तर हिंदुत्वनिष्ठांकडूनही संघटितपणे प्रत्युत्तर !

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात निवेदन दिल्याचे प्रकरण

एका हिंदुत्वनिष्ठाच्या पाठीशी संघटितपणे उभे रहाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) : येथे अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी निवेदन देण्यात सहभाग घेतला; म्हणून १५ मेपासून स्थानिक धर्मांध हे डॉ. लंबे यांना विविध मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात डॉ. लंबे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तीन तक्रारी दिल्या, तसेच काही धर्मांधांची नावेही दिली. यामुळे ३० मेच्या रात्री ९ वाजता काही धर्मांधांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन डॉ. लंबे यांना जाब विचारला. (धर्मांधांकडून डॉ. लंबे यांना धोका असल्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ सुरक्षा पुरवावी, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयी हिंदुत्वनिष्ठांना कळल्यावर लगेचच तेही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे धर्मांधांना तेथून जावे लागले.

या संदर्भात झालेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे –

१. ३० मेच्या रात्री डॉ. लंबे यांच्या दवाखान्याच्या पायरीवर काही तरुण बसले होते. गेल्या १५ दिवसांत हेतूपुरस्सर काही जणांकडून दिल्या जाणार्‍या त्रासाच्या पार्श्‍वभूमीवर तेथे बसणार्‍या व्यक्तींचे छायाचित्र काढण्याच्या सूचना पोलिसांनी डॉ. लंबे यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ. लंबे यांनी त्या तरुणांचे छायाचित्र काढले. थोड्याच वेळात त्यांपैकी एका तरुणाच्या आईने ‘माझा मुलगा तुम्हाला काही त्रास देत नाही, तर त्याचे छायाचित्र कशाला काढले ?’, असा जाब विचारला. तिच्यासोबत गल्लीतील काही महिलाही आल्या होत्या. थोड्याच वेळात मुलाचे वडीलही आले. ‘तुमच्याकडे आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी येणार नाही’, अशा आशयाची धमकी देऊ लागले.

२. तेवढ्यात तेथील स्थानिक ४० ते ५० धर्मांध तरुणांचा गटही त्याविषयी विचारणा करण्यासाठी रुग्णालयात आला. ‘‘तुम्हाला या गल्लीतील मुले काही त्रास देत नाहीत. इतर ठिकाणची मुले हे करतात, तरी तुम्ही गल्लीतील मुलांची नावे पोलिसांना का देता ?’ असे विचारू लागली. तसेच तुम्हाला अडचण असल्यास आम्हाला सांगायचे, इतरांना कशाला सांगता. यापूर्वी आम्ही तुम्हाला साहाय्य करत होतो’, असे म्हणू लागले.

या काळात हा जमाव जमल्याचे पाहून एका हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याने इतर हिंदुत्वनिष्ठांना दूरभाष करून बोलावून घेतले. त्या वेळी पाच मिनिटांत ५० हिंदुत्वनिष्ठ जमा झाले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मांध यांच्यात शाब्दीक वादावादी चालू झाली.

रात्री ९ वाजल्याने काही धर्मांध नमाजासाठी निघून गेले, तर काही धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठ आल्यामुळे निघून गेले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *