मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्या रणरागिणी शाखेचे अभिनंदन !
लासूरगाव (जिल्हा संभाजीनगर) : येथील ४ वर्षीय मुलीवर अल्पवयीन धर्मांध शाहरूख शेख याने निर्घृण बलात्कार केला. आरोपीला बालगुन्हेगार ठरवण्यात आले असून त्याला बालसुधारगृहात ठेवले आहे. याच्या विरोधात रणरागिणी शाखेने पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांना निवेदन दिलेे. निवेदनात म्हटले आहे की, १७ वर्ष ६ मासांच्या मुलांना बलात्कार करण्याएवढे शहाणपण आहे. त्यामुळे त्याला बालगुन्हेगार ठरवता येणार नाही. आरोपी शेख हाही कठोर शिक्षेस पात्र ठरतो.
निवेदनात केलेल्या अन्य मागण्या . . .
१. बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ मध्ये सुधारणा होऊन त्यातील वय अल्प केले असतांना आरोपी शाहरूख जाफर शेख याला बालसुधारगृहात ठेवलेच कसे ? आरोपीवर बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ प्रमाणे कारवाई व्हावी.
२. पीडित मुलीच्या घरातील व्यक्तींना अजूनही वैद्यकीय अहवाल आणि प्रथमदर्शनी अहवालची प्रत मिळाली नाही. त्यांना संपूर्ण माहिती लवकर मिळावी.
३. आरोपीला जामीन देण्याची घाई करू नये.
४. खटल्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा.
५. खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्ता अधीक्षक उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात