हिंदु जनजागृती समिती जिहादी डॉ. झाकीर नार्इकच्या देशद्रोही कारवायांच्या विरोधात २०११ पासून तक्रारी करत आहे. परंतु झाकीर नाईकच्या व्यासपीठावर जाऊन त्याला आलिंगन देणाऱ्या तत्कालीन कांग्रेस सरकारचे मंत्री के. रहमान खान यांनी झाकीर नाईकची चौकशी करण्याऐवजी हिन्दू जनजागृती समिती आणि सुदर्शन न्यूज यांच्या विरोधात कार्रवाईचे आदेश दिले.
बांग्लादेश मधील आतँकवादात झाकीर नाईकचा सहभाग स्पष्ट झाल्यावर आणि दिल्लीत सत्तापालट झाल्यावर तब्बल ६ वर्षांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याच्यावर कारवार्इ करण्यात आली. यूएपीए कायदयाने त्याच्या कारवायांवर बंदी घातली असली, तरी अजूनही त्याचे फेसबुक अकाऊंट चालूच आहे. हे अतिशय गंभीर अाहे. वर्ष २०१३ पासून हिंदु जनजागृती समितीचे फेसबुक अकाऊंट काेणताही गुन्हा केला नसतांना त्यावर बंदी घालण्यात आली. जी आजही कायम अाहे अाणि दुसरीकडे बंदी घातलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे आणि जिहादी झाकीर नार्इकचे फेसबुक खुलेआम चालू आहे. हे सरळसरळ हिंदूंवर अन्याय आणि जिहाद्यांना मोकळीक दिल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच ‘जर झाकीर नार्इकचे फेसबुक अकाऊंट त्वरित बंद केले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध करू’, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे.