हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नागेश ताकभाते यांची गृहखाते, गृहसचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्याकडे तक्रार
अशी मागणी करावी लागणे, हे सरकार आणि अन्वेषण यंत्रणा यांना लज्जास्पद आहे ! विद्वेषी विचार पसरवणाऱ्यांच्या विरोधात सरकार स्वत: कारवाई कधी करणार ? राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करणाऱ्यां हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक खाते वर्ष २०१३ पासून नाहक बंद करणारे सरकार जिहादी डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी आणत नाही, हे संतापजनक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पणजी : आतंकवादी विचार पसरवण्याच्या आरोपाखाली भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेले डॉ. झाकीर नाईक आणि त्यांच्या बंदी असलेल्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ यांची फेसबूक खाती (अकाऊंट) अजूनही चालू आहेत. ही खाती त्वरित बंद करण्यात यावीत, अशी तक्रार हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश ताकभाते यांनी गृहखाते, गृहसचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांकडे ५ जून या दिवशी केली. या तक्रारीची प्रत गोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे कारवाईसाठी देण्यात आली आहे. या तक्रारीद्वारे डॉ. झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबूक अकाऊंट त्वरित (ब्लॉक) बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर नाईक, तसेच त्यांचे फेसबूक खाते चालवणारे सहकारी, इस्लामिक रिसर्च फाउंडेशन आणि या फेसबूकवरील लिखाणाला प्रतिसाद देणारे त्यांचे समर्थक (फॉलोअर्स) यांच्यावर कारवाईची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ढाका येथे आतंकवादी आक्रमण घडवून आणणाऱ्यां आतंकवाद्यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाने प्रेरित झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अवैध कारवाई प्रतिबंधक कायद्याच्या (‘यूएपीए’च्या) अंतर्गत त्यांच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी ३ वेळा समन्स बजावूनही डॉ. झाकीर नाईक उपस्थित राहिलेले नाहीत. डॉ. झाकीर नाईक यांच्यावर इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषणांद्वारे विद्वेष पसरवणे, आतंकवाद्यांना निधी पुरवणे, तसेच मनी लाँडरिंग (पैशांची अवैधरित्या देवाण-घेवाण) करणे, आदी आरोप आहेत.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर १७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी बंदी घालण्यात आली. ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेला निधी मिळवण्याच्या माध्यमातून आर्थिक अपव्यवहार केल्याच्या प्रकरणीही डॉ. नाईक यांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणांमुळे अडचणीत येण्याची शक्यता असल्याने डॉ. झाकीर नाईक देशाबाहेर रहात आहेत.
डॉ. झाकीर नाईक हे त्यांच्या समर्थकांना दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी चिथावणी देत आहेत, याचे अनेक पुरावे गृहखात्याकडे आहे. त्यांनी कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन यांचा जाहीरपणे उदोउदो केला आहे. प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी बनले पाहिजे. मुसलमानांच्या मनात आले असते, तर या भारतात ८० टक्के हिंदू राहिले नसते, अशी प्रक्षोभक मते ते आत्मघातकी आक्रमणांचे समर्थन करतांना मांडतात. त्यांनी हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला आहे. सोन्याचे मंदिर हे मक्का आणि मदिनापेक्षा पवित्र नाही, असा दावा ते जाहीरपणे करतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात