Menu Close

अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रमेश कदम यांची पोलिसाला शिवीगाळ

मुंबई : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची मुजोरी अजूनही सुरुच आहे. रमेश कदम यांनी पुन्हा एकदा पोलिसाला शिवीगाळ केली आहे.

या प्रकरणी नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन आठवड्यात दोन वेळा त्यांच्या गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश कदम सध्या भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जेलमधील एका पोलिस कॉन्टेबलने शुक्रवारी सकाळी रमेश कदम यांना त्यांच्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाताना पाहिले. परत येण्यास सांगितले असता कदमांचा पारा चढला आणि पोलिसाला शिवगाळ केली.

यानंतर नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी रमेश कदमांवर एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

स्त्रोत : एबीपी माझा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *