अशी भूमिका भारताने घेतली असती, तर एव्हाना देशातील आतंकवाद कधीच नष्ट झाला असता !
सेंट पीटर्सबर्ग (रशिया) – सिरीयातून आतंकवाद्यांनी रशियात येण्याची आम्ही वाट पहाणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपिय राष्ट्रांना सुनावले आहे. आतंकवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
रशियाचे अंदाजे ४ सहस्र नागरिक आणि स्वतंत्र देशांच्या राष्ट्रमंडळातील (पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्यातील सदस्य देश) साडेचार सहस्र ते ५ सहस्र जण सिरीयात आतंकवाद्यांच्या बरोबरीने लढत आहेत, अशी माहिती पुतिन यांनी दिल्याचे स्पुतनिक या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात