Menu Close

विजयपूर (कर्नाटक) : दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे गर्भवती मुसलमान तरुणीला कुटुंबियांनी जिवंत जाळले !

  • धर्मांधांची ही असहिष्णुता पुरोगाम्यांना कधी दिसणार ?

  • तथाकथित निधर्मीवादी ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे म्हणतात, आता या घटनेत ते काय बोलणार आहेत ?

विजयपूर (कर्नाटक) – येथे एका मुसलमान तरुणीने दलित तरुणाशी विवाह केल्यामुळे गर्भवती असलेल्या या तरुणीला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून दोन जण फरार आहेत. जाळण्यापूर्वी तिला मारहाणही करण्यात आली होती.

विजयपूर जिल्ह्यातील गुंडनकला गावात ही घटना घडली. २१ वर्षीय बानू बेगम हिचे त्याच गावातील सायबन्ना शराप्पा याच्यावर प्रेम होते. सायबन्ना दलित असल्यामुळे बानूच्या कुटुंबियांनी त्याला विरोध केला होता. या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. काही कालावधीनंतर ते परत गावी आले. या वेळी बानू गर्भवती होती. ही माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी या दोघांना मारहाण केली. आणि बानू हिला जाळले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *