नवी देहली – दुभत्या गुरांच्या हत्त्येसाठी त्यांना बाजारात विकण्यावर केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधांचा विरोध करण्यासाठी केरळमध्ये गोमांस मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कृतीचा विरोध म्हणून येथील केरळ हाऊसमध्ये गोरक्षकांनी घुसून दूध वाटल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर केरळ हाऊसने अधिक सुरक्षेची मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी सांगितले, भारतीय गोरक्षक क्रांती या संघटनेचे सदस्य असल्याचे सांगणार्या १२ ते १४ जणांनी केरळ हाऊसमध्ये घुसून गोरक्षकांनी दूध वाटण्यास चालू केले. ते म्हणाले की, यासाठी कोणत्याही अनुमतीची आवश्यकता नाही. आम्ही धर्मानुसार काम करत आहोत.