कोयंबेडू (चेन्नई) – येथील श्री सारबेश्वर मंदिरात ४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांना मार्गदर्शन करण्यात आले. मंदिरातील पूजा झाल्यानंतर समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी उपस्थित भाविकांना कुलदेवता, दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमा यांविषयी माहिती सांगितली. या मार्गदर्शनाचा लाभ मंदिरात आलेल्या ५०० भाविकांनी घेतला. या वेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकांचे वितरण करण्यात आले. समितीचे कार्यकर्ते श्री. काशिनाथ शेट्टी, श्री. प्रभाकरन् आणि श्री. जयकुमार या उपक्रमात सहभागी झाले होते.
क्षणचित्र : मार्गदर्शनाच्या १ घंट्याच्या कालावधीत १२५ स्मरणिकांचे वितरण झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात