Menu Close

सीएनएनच्या सूत्रसंचालिकेकडून संस्कृत भाषेच्या सूत्रावरून प्रतिष्ठित ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या मुलीची टिंगल !

पाश्‍चात्त्यांचा संस्कृतद्वेष ! काँग्रेसने संस्कृत भाषेला मृतवत् केल्यामुळे जगभरातही तिची टिंगल करण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृतला पुन्हा तिचे मूळ स्थान मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सूत्रसंचालक कॅमेरोटा आणि अनन्या विनय

न्यूयॉर्क : ९० व्या स्क्रीप्स नॅशनल स्पेलिंग बी या स्पर्धेमध्ये विचारण्यात आलेल्या स्पेलिंगपैकी ३५ शब्दांची स्पेलिंग अचूक सांगून अनन्या विनय (वय १२ वर्षे) हिने विजेतेपद प्राप्त केले होते. यामुळे अनन्या हिची सीएन्एन् या वृत्तवाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली. या वेळी सूत्रसंचालिकेने संस्कृत भाषेवरून अनन्या हिची टिंगल केली. (सध्या पाश्‍चात्त्यांनाही संस्कृतचे महत्त्व पटल्याने ते त्याचा अभ्यास करत आहेत; मात्र ‘सीएन्एन्’वाल्यांमध्ये पराकोटीचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष असल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा प्रकारे भारतीय वंशाच्या नागरिकांची टिंगलटवाळी करून भारतद्वेष आणि हिंदूद्वेष यांचा कंड शमवून घेतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

वारंवार संस्कृत भाषेची टिंगल करणारी सूत्रसंचालिका

सूत्रसंचालक कॅमेरोटा हिने अनन्या हिला अस्तित्वात नसलेल्या ‘covfefe’ या शब्दाचे स्पेलिंग विचारले. अनन्याने या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केल्यावर ‘covfefe’ हा निरर्थक शब्द आहे. कदाचित तो संस्कृतमधून आला असावा. तुम्ही प्रतिदिन व्यवहारात संस्कृत वापरता. त्यामुळे मला या शब्दाविषयी कल्पना नाही’, असे म्हणत तिची टिंगल केली. (कॅमेरोटा यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! इंग्रजी भाषेत असले निरर्थक शब्द असतील; संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्द हे अर्थपूर्ण आणि सौंदर्याने युक्त असतात ! अशी टिंगल करण्याऐवजी कॅमेरोटा यांनी संस्कृतचा अभ्यास करावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या घटनेनंतर सूत्रसंचालिका कॅमेरोटा हिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याआधीही तिने संस्कृत भाषेची टिंगल करण्याचा प्रयत्न केला होता. (सीएनएनचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष प्रचलीत आहे. त्याला सुतासारखे सरळ करण्यासाठी भारतीय शासनकर्ते काही कृती करणार कि नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्वीटमध्ये ‘negative press coverage’ ऐवजी ‘negative press covfefe’ असे टंकलिखित झाले होते. त्यानंतर अमेरिकेत ‘covfefe’ हा शब्द गमतीचा विषय बनला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *