५ कोटी बांगलादेशी घुसखोरांनी देश पोखरला असतांना भारतातील कोणताही राजकीय नेता असे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही, हे सत्य जाणा !
बर्लिन : जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी मॅनहायमर मॉर्गन दैनिकाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले पाहिजे आणि आवश्यकता वाटल्यास त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मला कधीही असे केलेले आवडणार नाही; मात्र अंतिम पर्याय म्हणून सैन्यबळाचा वापर करावा लागेल. पेट्री यांच्या या विधानावर देशातील साम्यवादी पक्षांनी आणि जर्मन पोलीस युनियन यांनी टीका केली.
१. जर्मनीत शरणार्थींच्या स्थानांवर आक्रमण होण्याच्या घटनेत २०१४ च्या तुलनेत पाच पट वाढ झाली आहे. या स्थानांवर १ सहस्र ५ वेळा आक्रमणे झाली आहेत.
२. दोनच दिवसांपूर्वी जर्मनीच्या चान्सलर अँजेेला मार्केल यांनी म्हटले होते की, सीरिया आणि इराकमधून येणारे बहुतेक शरणार्थी त्यांच्या देशातील युद्ध संपल्यावर परतणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात