गोवा येथे होणाऱ्यां सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे पत्रकार परिषद
हुब्बळ्ळी (कर्नाटक) : केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ हिंदु राष्ट्रातच पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी रामराज्यासारख्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद यांनी केले.
१४ ते १७ जून या कालावधीत होणार्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची माहिती देण्यासाठी ८ जून या दिवशी येथील पत्रिकाभवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी श्री. गुरुप्रसाद पुढे म्हणाले, ‘‘गेल्या ५ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ठरवल्याप्रमाणे समान कृती कार्यक्रमांचे अवलोकन आणि त्याला वेग येण्यासाठी निर्धार करण्यात येईल.’’
या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार, विश्व हिंदु परिषदेचे कर्नाटक उत्तरप्रांताचे उपाध्यक्ष तथा कनकदास शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री. शांतण्ण कडिवाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे धारवाड अन् गदग जिल्हा समन्वयक श्री. वेंकटरमण नायक हे उपस्थित होते. कु. नागमणी आचार यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनानंतर १९ ते २१ जून या कालावधीत होणाऱ्यां ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’ची माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात