लक्ष्मणपुरी विश्वविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा
किती शासनकर्ते असे बोलण्याचे धाडस करतात ? ढोंगी निधर्मीवाद झिडकारून हिंदुत्वाचा उद्घोष केवळ संत-महंतच करू शकतात !
लक्ष्मणपुरी : हिंदु ही प्रत्येक भारतियाची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने हिंदु असल्याचा अभिमान बाळगावा; पण संकोच बाळगू नये, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लक्ष्मणपुरी विश्वविद्यालयात आयोजित केलेल्या ‘हिंदवी स्वराज्य दिन’ कार्यक्रमात बोलत होते. शिकागोमधील परिषदेत स्वामी विवेकानंद यांना हिंदुत्वाविषयी विचारले असता, ‘मला हिंदु असल्याचा गर्व आहे’, असे ते म्हणाले होते, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, ‘सत्यम्, शिवम् सुंदरम्’ हा हिंदुत्वाचा मूळ हेतू आहे.
उपासनेच्या पद्धती पालटल्या असल्या, तरी आपले पूर्वज पालटत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते; पण औरंगजेब नाही. राष्ट्रविरोधी मानसिकतेविरोधात संघर्षासाठी पुढे यावे, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना केले. शैक्षणिक संस्थांमधील विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात संघर्ष करायला हवा, असेही ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात