हिंदूंनो, हिंदूसंघटनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र निर्माण झाल्याविना या दंगली बंद होणार नाहीत !
नंदुरबार : येथे धर्मांधांच्या जमावाने १० जून या दिवशी सकाळी शहाराच्या मध्यवर्ती भागात पुष्कळ मोठ्या प्रमाणात घरे आणि दुकाने यांच्यावर दगडफेक करणे, घरे आणि दुकाने पेटवणे, सामानाची नासधूस करणे, वाहनांची नासधूस करणे आदी प्रकार करून मोठी दंगल घडवली आणि पुष्कळ मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली. या वेळी पोलिसांचे वाहन पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या वेळी ३ पोलीस कर्मचारीही या दंगलीत घायाळ झाले. विशेष म्हणजे दंगलीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपाययोजना म्हणून पोलिसांचा ताफा या ठिकाणी ठेवला होता; तरीही ही दंगल झाली. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर, तसेच लाठीमार करून संपूर्ण बळ पणाला लावत ही दंगल आटोक्यात आणली. पोलिसांनी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांना अटक केली आहे.
दंगलीच्या वेळी मंदिर आणि प्रार्थनास्थळ यांच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आली. तोंडाला रुमाल बांधलेले तरुण रस्त्यावरून दहशत निर्माण करत फिरत असल्याने नागरिकांना काश्मीरमधील स्थितीचे स्मरण झाले. दहशतीमुळे नंदुरबारला अघोषित संचारबंदीचे स्वरूप प्राप्त झाले. सध्या संपूर्ण शहारात संचारबंदी असून तणावाचे वातावरण आहे.
येथील शब्बीर शेख मासूम पिंजारी (वय ७५) या ‘चिकन टिक्का’ विकणार्या वृद्धाशी सचिन मराठे या युवकाचा वाद झाल्याने सचिनवर सामूहिक आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर बेदम मारहाण करण्यात आलेल्या सचिनला रुग्णालयात हालवण्यात आले. या वादाच्या वेळी पिंजारी यांच्या गाडीवरल पेट्रोल आणि पेटती शेगडी त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ९ जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच १० जून या दिवशी ही दंगल पेटली. सचिन तसेच धर्माधांचा जमाव या दोघांवर गुन्हे प्रविष्ट झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात