Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या स्वागतासाठी सनातनच्या रामनाथी आश्रमासमोर उभारली लक्षवेधक कमान !

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची सिद्धता अंतिम टप्प्यात

प्रवेशद्वारावर उभारलेली वैशिष्ट्यपूर्ण स्वागत कमान

रामनाथी (गोवा) : पुण्यभूमी असलेल्या परशुरामभूमीत १४ जूनपासून होणाऱ्यां ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पूर्वसिद्धतेची लगबग चालू आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात हिंदु जनजागृती समितीचे, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते नेटाने कार्यरत आहेत. अधिवेशनाला उपस्थित रहाणाऱ्यां हिंदुत्वनिष्ठांच्या स्वागतासाठी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर वैशिष्ट्यपूर्ण कमान उभारण्यात आली आहे.

ही कमान रस्त्यावरून येणाऱ्यां-जाणाऱ्यां सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गोमंतकीयांमध्येही या अधिवेशनाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे पहावयास मिळत आहे. अधिवेशनस्थळ असलेल्या श्री रामनाथी देवस्थान येथेही अधिवेशनाची सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. देशभरातून विविध हिंदुत्वनिष्ठांचे रामनाथी येथे आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. हिदुं राष्ट्राच्या उद्घोषासाठी आतापर्यंत झालेल्या ५ हिंदु अधिवेशनाप्रमाणेच ६ वे हिंदु अधिवेशनही यशस्वी करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *