बेंगळुरू (कर्नाटक) : १४ ते १७ जून या कालावधीत गोवा येथे होणार्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने कर्नाटकातील नम्म टिव्ही या वाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले हेते. यात हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर, एस्डीपीआयचे (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे) अक्रम हसन यांनी सहभाग घेतला.
श्री. चंद्र मोगेर या वेळी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुसलमानांचे लांगूलचालन, धर्मांतर, हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण, देवतांचा अवमान आदी आघात हिंदूंवर होत आहेत. जगात आज ५२ इस्लामी देश आहेत. अशा वेळी हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नसल्याने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येक प्राणीमात्राच्या अभ्युदयाचा विचार करण्यात येईल. हिंदु राष्ट्र सनातन धर्मानुसार चालणार असल्याने याद्वारे जगाचे कल्याण होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात