Menu Close

आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील भगवा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांकडून दंगल !

असहिष्णुतेचा कांगावा करणारे धर्मांधांच्या या कृत्यांविषयी ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मांधांची हिंदूंवर वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूसंघटन हाच पर्याय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

  • धर्मांधांकडून हिंदु महिलांना मारहाण
  • वाहनांची नासधूस
  • पोलिसांची बघ्याची भूमिका

आळते (तालुका हातकणंगले) : येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून भगवा झेंडा फडकत आहे. हा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला गंभीर दुखापत झाली असून आणखी ३ हिंदू घायाळ झाले आहेत. धर्मांधांनी हिंदूंच्या घरात घुसून गज आणि काठ्या यांनी महिलांनाही मारहाण केली आहे, (धर्मांधांच्या या आक्रमणांना तोंड देण्यासाठी हिंदूंना आत्मरक्षणासाठी सिद्धता कराविशी वाटली, तर चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. (ही हानी या धर्मांधांकडून कोण भरून घेणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. गावात तणावाचे वातावरण आहे. (धर्मांधांचा वाढता उद्दामपणा पहाता देशात शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो ! धर्मांधांच्या दंगली रोखण्यासाठी पोलीस ठोस पावले उचलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. ३१ जानेवारीला मध्यरात्री धर्मांध धर्मांधांनी दर्गाह चौक येथे रातोरात कठडा उभारून तेथे त्यांचा झेंडा लावला होता. १ फेब्रुवारी या दिवशी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी शर्मा यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. त्यात प्राथमिक केंद्रशाळा, मुख्य बाजारपेठ, तसेच दर्गाहजवळील खोकी हटवण्यात आली.

२. अतिक्रमणविरोधी पथक दर्गाह चौकातील कठडा काढत असतांना धर्मांधांनी त्याला विरोध केला. शिवाजी चौकातील झेंडा हटवल्याशिवाय आमचा झेंडा काढू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. या वेळी किरकोळ बाचाबाची झाली.

३. यानंतर शिवाजी चौकातील झेंडा असलेला कठडा काढला जात असतांना शिवाजी चौक येथील हिंदुत्ववाद्यांनी त्याला विरोध करून दुपारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ऐतिहासिक साक्ष असलेला भगवा झेंडा काढण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत हिंदूंनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडले.

४. त्यानंतर धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. तेथे दिलेल्या घोषणांंमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला.

५. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर, शहापूर, इचलकरंजी, पेठवडगाव येथील पोलीस कुमक मागवण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे घटनास्थळी उपस्थित झाले.

६. हिंदुत्ववाद्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. बारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वाहनांवर दगडफेक, महिलांनाही मारहाण !

१. या वेळी धर्मांधांनी गावातून फेरी काढली. या वेळी फेरीतील धर्मांधांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांवर दगडफेक करून वाहनांची मोडतोड चालू केली. तसेच हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली आणि लोखंडी गज, काठ्या यांच्या साहाय्याने घरात घुसून महिलांना मारहाण केली.

२. या मारहाणीत श्री. संदीप गोरे या हिंदु तरुणाचा एक पाय निकामी झाला आहे, तर सर्वश्री शेंडगे, किरण खाडे आणि अन्य एका हिंदूच्या हात अन् पाय यांना गंभीर दुखापत झाली आहे. या सर्वांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

३. या घटनेत धर्मांधांनी २ रिक्शा, १ ओमनी गाडी, २ दुचाकी यांची मोडतोड केली. दहशत माजवण्याच्या प्रकारामुळे पोलीसही हतबल झाले आहेत.

मोर्चा काढणाऱ्या हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांचा लाठीमार !

दंगलीची माहिती मिळाल्यानंतर हातकणंगले आणि इचलकरंजी येथून हिंदुत्ववादी आळते गावात दाखल झाले. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला. त्यानंतर राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या पाचारण करण्यात आल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी आळते गावास भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे प्रविष्ट करण्याचे काम चालू होते.

पोलीस निरीक्षक अत्तार यांची चौकशी करा ! – श्री. बाळ महाराज

हातकणंगले परिसरात वारंवार जातीय तेढ निर्माण होत आहे. आळते येथील काही धर्मांध पोलीस निरीक्षक अत्तार यांच्याशी सलगी ठेवून आहेत. हिंदु आणि धर्मांध यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे सामाजिक शांतता बिघडत असून अत्तार यांचे स्थानांतर करून चौकशी करावी, अशी मागणी विहिंपचे श्री. बाळ महाराज यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याकडे केली आहे. (ज्या ठिकाणी एखादा पोलीस अधिकारी धर्मांध असतो, तेथे धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार अधिक होत असल्याचे लक्षात येते. तसेच कोणतीही घटना घडल्यानंतर धर्मांध पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक हिंदूंवरच गुन्हे प्रविष्ट केले जातात. हे पूर्वनियोजित असल्याने अशा पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *