हिंदु जनजागृती समितीचा दक्षिण कन्नडमध्ये झालेला प्रसार
१. मंगळुरू येथील कृतीशील धर्माभिमानी श्री. मुरलीधर शेट्टी !
‘मंगळुरू येथील एडापाडवू या गावात हिंदु धर्मजागृती सभा झाली. येथील धर्माभिमानी श्री. मुरलीधर शेट्टी यांनी या सभेसाठी आपले सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले आणि सभेसाठी ध्वनी अन् प्रकाश यांची व्यवस्था करून दिली. या सभेनंतर लगेचच वक्त्यांशी संवाद साधतांना श्री. मुरलीधर शेट्टी यांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला. या वेळी ते म्हणाले, ‘‘सर्व हिंदूंनी प्रतिदिन टिळा लावणे आणि मंदिरात जाणे, या कृती केल्या पाहिजेत.’’ तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या १०० हून अधिक धर्माभिमान्यांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यानुसार आचरण करणार असल्याचे सांगितले. या वेळी श्री. मुरलीधर शेट्टी यांनी टिळा लावण्यासाठी सर्वांना सनातन कुंकू विनामूल्य देणार असल्याचे सांगितले.
२. या कार्यक्रमात गुढी पाडव्याविषयी शास्त्रीय माहिती सांगितल्यानंतर सर्व धर्माभिमान्यांनी त्या पुढील आठवड्यापासून त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची मागणी केली आहे.
३. उजिरे केंद्रात सौ. रेवती यांनी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त प्रवचनाचे आयोजन केले होते. या पूजेसाठी उपस्थित असलेल्या ५० धर्माभिमान्यांना सनातन कुंकूचे वितरण करण्यात आले.
अनुभव
केवळ हिंदूंच्या कार्यक्रमांच्या वेळी वेगवेगळी कारणे सांगून अनुमती नाकारणारे पोलीस ! : एडापाडवू येथील सभेसाठी बजरंग दलाचे श्री. जनार्दन यांनी दुचाकी वाहनफेरीचे दायित्व घेतले होते. ते दुचाकी फेरीसाठी पोलिसांची अनुमती मागण्यास गेले असता ‘केरळच्या मुख्यमंत्र्यांविषयी मंगळुुरू येथे मत व्यक्त केल्यामुळे अजून या भागातील वातावरण निवळलेले नाही. त्यामुळे आम्ही या फेरीला सुरक्षा देण्यास असमर्थ आहोत’, असे पोलिसांनी सांगितले आणि या फेरीसाठी अनुमती देण्यास नकार दिला. पोलीस केवळ हिंदूंच्या कार्यक्रमांच्या वेळी वेगवेगळी कारणे सांगून कार्यक्रमांना अनुमती नाकारतात, असे स्पष्ट झाले.’
– श्री. चंद्र मोगेर, समन्वयक, दक्षिण कन्नड, कर्नाटक.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात