अधिवक्ता प्रशांत भूषण यांना हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ !
अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी केलेले ट्वीट
What were Fringe organizations accused of murder etc become mainstream as they get together to discuss Hindu Rashtra https://t.co/ytToxkzrkJ
— Prashant Bhushan (@pbhushan1) June 10, 2017
मुंबई : ज्यांच्यावर खून वगैरेंसारखे आरोप आहेत, अशा मुख्य प्रवाहाबाहेरील संघटना (फ्रिंज ऑर्गनायझेशन्स) हिंदु राष्ट्राविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र येेऊन मुख्य प्रवाहात आल्या आहेत, अशा संदिग्ध आशयाचे ट्वीट हिंदुविरोधी वादग्रस्त ट्वीट करण्यास प्रसिद्ध असलेले अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी केले आहे. अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी यापूर्वीही भगवान श्रीकृष्ण, काश्मीर यांविषयी अत्यंत हीन पातळीवर जाऊन ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जनक्षोभ उसळल्याने त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. काश्मीरविषयीच्या त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रप्रेमींकडून त्यांना मारहाणही झाली होती. (भारतीय लोकशाहीने प्रत्येक व्यक्ती, संघटना यांना त्यांचे विचार मांडण्याची, त्या दृष्टीने कृती करण्याची संधी दिली आहे. या आधारेच हिंदु जनजागृती समितीला हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. हिंदु जनजागृती समितीच्या विरोधात देशभरातील एकाही पोलीस ठाण्यात साधी एक तक्रारही नाही. असे असतांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील असलेल्या प्रशांत भूषण यांनी अशी अभ्यासहीन विधाने करून त्यांची हिंदुविरोधी वृत्तीच दाखवून दिली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे होणार्या ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५० हून अधिक संघटना एकत्र येत आहेत. या हिंदू अधिवेशनाला मिळत असलेल्या देशभरातील पाठिंब्यामुळे उठलेल्या पोटशुळातून अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी हे ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या खाली त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या ट्वीटला काही फॉलोअर्सनी प्रशांत भूषण यांच्या बाजूने, तर काहींनी हिंदु जनजागृती समितीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात