Menu Close

दूधासाठी कतार ४ हजार गाईंना करणार एअरलिफ्ट

गोमांस साठी गार्इंची हत्या करणारे यातुन काही बोध घेतील का ? – संपादक, हिंदुजागृति

डोहा : कतारचा शेजारच्या देशांसोबत सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही कतारने मात्र कोणत्याही प्रकारचा करार करण्यास किंवा माघार घेण्यास नकार दिला आहे. आपल्यावर लावण्यात आलेल्या बंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी कतार वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. यानिमित्ताने कतारमधील एका व्यवसायिकाने चार हजार गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, देशात दूध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीच या गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कतारमध्ये एवढे मोठे संकट आले असताना देशवासी मात्र सरकारसोबत ठामपणे उभे आहेत. कतारमधील प्रत्येक व्यक्तीची कमाई लक्षात घेतली तर जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखले जाते.

कतार अन्न आणि दूधासारख्या गरजू गोष्टींसाठी सौदीवर अवलंबून होते. मात्र आता सौदीने सर्व प्रकारचे संबंध तोडले असल्याने देशात दूधसंकट उभे राहिले आहे. या संकटाला सामोरे जात, सौदीला उत्तर देण्यासाठी कतारमधील व्यापारी मोताज अल खायात यांनी ४ हजार गाईंना एअरलिफ्ट कऱण्याचा निर्णय घेतला आहे. मोताज पॉवर इंटरनॅशनल होल्डिंगचे अध्यक्षही आहेत.

यासाठी कतार एअरवेजला किमान ६० वेळा उड्डाण घ्यावे लागणार आहे. एका निरोगी गाईचे वजन किमान 590 किलो आङे. या गाईंना ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून खरेदी कऱण्यात आले आहे. ‘गाईंना कतारला आणल्यानंतर त्यांची निगा राखण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे’, असे मोताज यांनी सांगितले आहे.

स्त्रोत : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *