अधिवेशन होऊ न देण्यासाठी व्हॉट्स अॅपद्वारे राज्यपालांना इमेल पाठवण्याचे संदेशात आवाहन
पणजी : गोव्यातील काही हिंदुद्वेष्ट्यांकडून सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला विरोध करणारा संदेश व्हॉट्स अॅपपवरून प्रसारित केला जात आहे. ‘शांतताप्रेमी गोमंतकीय या नात्याने माझी विनंती आहे की, १४ जून ते १७ जून या कालावधीत गोव्यात होणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होऊ देऊ नये’, असे निवेदन राज्यपालांना पाठवावे’, असे खोडसाळ आवाहन या संदेशात केले आहे. या संदेशात राज्यपालांचा इमेल पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांकही देण्यात आला आहे. या संदेशात म्हटले आहे की, ‘तुम्ही ख्रिस्ती, हिंदु किंवा मुसलमान किंवा अन्य कुठल्याही धर्माचे असलात, तरी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी असलेल्या या अधिवेशनाच्या विरोधात राज्यपालांच्या इमेल पत्यावर मोठ्या प्रमाणात पत्रे पाठवा. शांतताप्रिय गोमंतकीय या नात्याने हे अधिवेशन कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, असे त्यांना कळवा.’ (वर्ष २०१३ मध्ये तरुण तेजपालच्या थिंक फेस्ट या कार्यक्रमात तालिबानी आतंकवादी मुल्ला अब्दुल सलाम झैफ येऊन भाषण करून गेला. त्या वेळी कुठे होते हे शांतताप्रिय गोमंतकीय ? आतापर्यंत अशी ५ हिंदू अधिवेशने गोव्यात झाली. अधिवेशनामुळे ५ वर्षांत एकदा तरी गोव्याची शांतता बिघडली का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात