वर्ष २०१३ मध्ये आम्ही ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संपर्कात आलो. ‘भारताला शक्तीशाली बनवणे आणि हिंदु राष्ट्र स्थापन करणे, यांसाठी समितीची भूमिका फार महत्त्वाची आहे’, हे लक्षात आल्यावर आम्ही वर्ष २०१३ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’च्या मार्गदर्शनाखाली ‘हिंदू अधिवेशन’ आयोजित केले. त्यानंतर वर्ष २०१४ आणि २०१५ मध्येही या अधिवेशनाचे आयोजन केले आणि आता गोवा येथील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. प्रत्येक हिंदूला स्वत:च्या धर्माप्रती अभिमान असला पाहिजेे आणि त्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आरंभ केले पाहिजे. हे कार्य होण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ची नितांत आवश्यकता आहे.
– श्री. त्यागराजन्, संस्थापक, हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडी)