१४ जून या दिवशीच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन
उद्घाटनसत्रात मार्गदर्शन करतांना छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील प.पू. साध्वी सरस्वती यांनी राष्ट्र आणि धर्म यांसमोरील अनेक आघातांचा वेध घेतला. त्या म्हणाल्या,
१. प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी लढावे लागत आहे, हे खेदजनक आहे.
२. आज हिंदूंनाच धर्म सांगून हिंदू बनवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
३. निधर्मीवादाच्या नावाखाली विधर्म्यांकडून (अन्य पंथांकडून) आतंकवाद पसरवला जात आहे.
४. सध्या हिंदुत्वनिष्ठ शासन असूनही राममंदिराच्या निर्माणासाठी त्यांच्यापुढे हात जोडावे लागत आहेत. ज्या दिवशी हिंदूंचा आवाज बुलंद होईल, त्या दिवशी मंदिर निर्माण होईल.
५. गोमातेची हत्या आणि तिच्याविषयी अश्लाघ्य बोलले जाते. अशांना साम, दाम, दंड आणि भेद ही नीती अवलंबवायला हवी. गोमातेची हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
६. काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र चालू असून त्याचाच एक भाग म्हणून अमरनाथ यात्रा बंद करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
७. हिंदु राष्ट्र हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे. ज्यांना या देशात हिंदु राष्ट्र नको आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे.
८. सर्वांनी केवळ हिंदु राष्ट्राविषयी केवळ न बोलता स्वरक्षणार्थ सज्ज व्हायला हवे. देशातील सर्व हिंदूंना एकत्र करून देशरक्षण आणि हिंदु राष्ट्र बनवणे यांसाठी एकत्रित करायला पाहिजे.
९. देशात भगवा आतंकवाद नाही. हिंदूंनी देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या अग्नीत स्वतःला समर्पित केल्याने त्याचा रंग भगवा आहे.
१०. मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना औरंगजेबाचा इतिहास शिकवल्यानेच त्यांची स्वतःची स्थिती वाईट झाली आहे. त्यांनी अखिलेश यांना रामायण शिकवले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती.