Menu Close

हिंदूंनो, वीरत्व धारण करा ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी, हिंदू स्वाभिमान, डासना, उत्तरप्रदेश

१४ जून या दिवशीच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

यति मां चेतनानंद सरस्वतीजी, हिंदू स्वाभिमान, डासना, उत्तरप्रदेश

श्री विद्याधिराज सभागृह (गोवा) : जेव्हा इस्लामी जिहादी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा हिंदू त्यांना केवळ लुटारू समजत होते; मात्र सर्वच आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक तत्त्वांवरही आक्रमणे केली. अहिंसेच्या तत्त्वाची अयोग्य मांडणी केली. हिंदु धर्मानुसार अहिंसा म्हणजे अन्याय सहन न करणे, अत्याचारांचा बळाने सामना करणे आणि निर्बलांचे रक्षण करणे होय. म्हणूनच हिंदूंनी आता धर्मरक्षण आणि धर्मयुद्ध यांसाठी वीरत्व धारण केले पाहिजे. बकर्‍याचा बळी दिला जातो; पण सिंहाचा बळी देण्याचे धैर्य कुणी करत नाही. त्यामुळे वीरत्व हाच आता जगण्याचा मार्ग आहे. माझे गुरु यति महाराज म्हणतात, ‘वीरता, त्याग आणि बलीदान हीच सनातन प्रवृत्ती आहे.’ आज विश्‍वात मानवता जिवंत ठेवायची असेल, तर भारतात सनातन धर्म आणि हिंदु राष्ट्र असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या संत आणि हिंदू स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा यति मां चेतनानंद सरस्वती यांनी सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *