केंद्रीयमंत्री महेश शर्मा यांचे हिंदुत्ववाद्यांना मार्ग काढण्याचे आश्वासन !
केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य असतांना हिंदूंना पूर्ण दिवस पूजेचा अधिकार का मिळत नाही, असा हिंदूंच्या मनात येणारा प्रश्न चुकीचा कसा असेल ?
धार (मध्यप्रदेश) : येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत नमाजपठण होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला असल्याचे धर्मजागरण मंचाचे श्री. गोपाल शर्मा यांनी म्हटले आहे. या दिवशी सूर्योदय ते सूर्यास्त अशी पूजा करण्यास न दिल्यास बहिष्कार घालण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.
श्री. गोपाल शर्मा यांनी पुढे म्हटले की, या संदर्भात केंद्रीय संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधला होता. त्या वेळी त्यांनी लवकरच या प्रकरणी मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
भोजशाळा भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत आहे. हे सरस्वतीचे प्राचीन मंदिर आहे. येथे मुसलमान आक्रमकांनी कमाल शाह मशीद बांधली आहे आणि ते या जागेवर त्यांचा अधिकार सांगत आहेत. याला हिंदू गेली अनेक वर्षे विरोध करत आहेत. हिंदूंना प्रत्येक मंगळवारी पूजेची, तर प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती देण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात