राजस्थान शासनाने गोहत्या करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. असा निर्णय राष्ट्रव्यापी होणे आवश्यक आहे. गाय हा हिंदूंसाठी आस्थेचा विषय असल्याने देशपातळीवर केवळ गोहत्याबंदी नाही, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा व्हायलाच हवा, अशी मागणी छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प.पू. साध्वी सरस्वतीजी यांनी केली.
प.पू. साध्वी सरस्वतीजी पुढे म्हणाल्या . . .
१. गायीला वाचवायचे असेल, तर हिंदूंना गायींपासून होणारी उत्पादने अधिक प्रमाणात वापरावी लागतील, तसेच प्रत्येक हिंदूंने गाय पाळवी. वृद्ध गोमातांना पाळण्याची आपल्याला व्यवस्था निर्माण करावी लागेल. गोशाळांसाठी साहाय्य करावे लागेल.
२. केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्चित कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
३. एका चित्रपटात गायीची पूजा करूनही विशेष काही घडत नाही, असे अयोग्य चित्रीकरण दाखवण्यात आले होते. असे चित्रपट काढणार्यांचा मी निषेध करते.
४. ज्या देशात गायीला मातेसमान स्थान आहे, त्या देशातून सर्वाधिक गायीचे मांस निर्यात होते, हे अत्यंत वेदनाजनक आहे.
५. हिंदूंना एकत्र येऊन गोरक्षणाचे कार्य करावे लागेल. हे कार्य करतांना पोलिसांचे साहाय्य घ्या !
हिंदूंना शस्त्र ठेवण्याचे आवाहन स्वसंरक्षण आणि संस्कृती रक्षणासाठी ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी
‘हिंदूंनी शस्त्र ठेवावे’ असे आवाहन मी करत आहे; मात्र त्याचा नेमका मतीतार्थ समजून घेणे आवश्यक आहे. याचा उपयोग अन्य लोकांना मारण्यासाठी करायचा आहे, असे नाही, तर ‘हिंदूंवर आक्रमण होत असतांना त्यांनी स्वसंरक्षण आणि संस्कृती रक्षणासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे’, असा त्याचा मतीतार्थ आहे, असे मत प.पू. साध्वी सरस्वतीजी यांनी केले.
या वेळी प.पू. साध्वी सरस्वतीजी पुढे म्हणाल्या, ‘‘या देशातील जे जे गायीला माता मानतात, या देशाला आपली माता मानतात त्यांना आम्ही हिंदूच समजतो. या देशात काही राष्ट्रप्रेमी मुसलमानांनीही योगदान दिले आहे, अशांना आमचा विरोध नाहीच ! जी व्यक्ती हा देश, संस्कृती, धर्म यांना आपले मानते, त्यांना आम्ही आमचेच मानतो; मात्र याला जे जे विरोध करतील, त्यांना आमचा विरोधच असेल.’’