सर्व पशूंची काळजी घेणारी ‘पेटा’ ही आंतरराष्ट्रीय संघटना केरळमध्ये झालेल्या गोहत्येविषयी मूग गिळून गप्प का बसते ? कुठेतरी राहुल गांधींनी क्षमा मागितली; म्हणून त्यांचे अभिनंदन करते. हा विदेशी संस्थांचा गोद्रोहच आहे ! अजमेर दर्ग्याचे राष्ट्रप्रेमी दिवाण म्हणतात, ‘‘आमची अझान भारतातील हिंदू ऐकतात, तर आम्ही त्यांच्या गोमातेला माता का मानू नये ?’’ मुसलमानांची दिवसातून पाच वेळा अवैधरित्या दिली जाणारी बांग ऐकणारे राज्यकर्ते हिंदूंनी गोरक्षणासाठी फोडलेला टाहो का ऐकत नाहीत ? स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडे गोहत्याबंदीची मागणी करणार्या काँग्रेसने मतांच्या लांगूलचालनासाठी स्वातंत्र्यानंतर गोहत्याबंदी मागे घेतली. गाय हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर पारसी, जैन आदी पंथियांचेही श्रद्धास्थान आहे, तरीही निधर्मीवादी शासन गोहत्या का होऊ देते ? समाजातील कथित निधर्मी लोक वेदांचा मनमानी अर्थ लावत गोहत्येचे समर्थन केल्याचे पसरवतात. आम्हाला त्यांना विचारायचे आहे, अथर्ववेदात ‘गोहत्या करणार्याला शिशाची गोळी घालून ठार करावे’, असे म्हटले आहे, त्याविषयी त्यांचे काय मत आहे ? आमची मागणी ‘केवळ गोहत्याबंदी करा’, अशी नसून शासनाकडे आज असलेली गायरान भूमी गोमातेला परत करून त्या ठिकाणी गोअभयारण्य निर्माण केली जावीत, यासाठी हिंदूंचा दबावगट बनवा ! असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले
या वेळी पारित करण्यात आलेले घणाघाती गोरक्षण ठराव !
१. संपूर्ण देशात गोहत्याबंदी करा !
२. गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा !