Menu Close

गोरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

या देशात मतपेढीच्या राजकारणामुळे गायीला वाचवण्यासाठी केवळ गोवा राज्यच नव्हे, तर केंद्र स्तरावरही उदासीनता आहे. गाय हा हिंदूंच्या आस्थेचा विषय असतांना या विषयालाच प्राधान्य दिले जात नाही. प्रत्येक जण गायीला वाचवण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्नरत आहे; मात्र गोरक्षणासाठी आज देशव्यापी आंदोलन उभे रहाण्याची आवश्यकता आहे, असे मत गोवंश रक्षा अभियानाचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी केले.

श्री. हनुमंत परब पुढे म्हणाले . . .

१. गोवा ही देवभूमी आहे; मात्र या भूमीला अमली पदार्थांचा व्यापार, अनैतिकता अशा माध्यमांतून भोगमूमी बनवण्याचे काम चालू आहे. याला आपण प्राणपणाने विरोध केला पाहिजे.

२. गोरक्षण करतांना आमच्यावर अनेक खोटे खटले दाखल करण्यात आले. वर्ष २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या अशाच एका खोट्या खटल्यात आम्ही आजही न्यायालयात हेलपाटे मारत आहोत.

३. उत्तरप्रदेशात आज योगी आदित्यनाथ यांच्यामुळे आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे. हाच धागा पुढे पकडत देशव्यापी गोवंश हत्याबंदी कायदा झाला पाहिजे, अशी मागणी या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही करतो.

चौकट मोदी शासनाने ‘गाय पे चर्चा’ करावी ! – श्री. हनुमंत परब

ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *