Menu Close

जिहादी आतंकवाद आणि धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली यांपासून हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस उपाययोजनेचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

डावीकडून अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी., श्री. मुरली मनोहर शर्मा, डॉ. नील माधव दास, श्री. जीतेंद्र ठाकूर आणि श्री. प्रशांत जुवेकर

रामनाथी (गोवा) : देशामध्ये वाढत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया, धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या या सर्वांपासून हिंदूंचे रक्षण करण्या करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला. श्री रामनाथी देवस्थानातील बेताळ सभागृहामध्ये १४ जून या दिवशी झालेल्या ‘जिहादी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण’ या चर्चासत्रामध्ये हिंदुत्वनिष्ठांनी जिहादी आतंकवादाच्या दाहकतेविषयी उपस्थितांना अवगत केले. या वेळी मध्यप्रदेश येथील अखिल भारतीय हिंदू महासभेचे श्री. जीतेंद्र ठाकूर, झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नील माधव दास, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी., ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी उद्बोधनसत्रात सहभाग घेऊन उपस्थित हिंदुत्वनिष्ठांचे उद्बोधन केले.

उद्बोधन सत्रामध्ये करण्यात आलेले ठराव

१. केंद्रशासनाने देशामध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवणारा कायदा तात्काळ करावा.

२. बांगलादेशातून प्रतिदिन भारतात येणार्‍या बांगलादेशी नागरिकांसाठी ‘कामाची अनुमती’ (वर्क परमिट) देणारा कायदा संसदेत पारित करावा.

३. दंगलीनंतर पीडितांना हानीभरपाई देण्यासाठी नेमण्यात येणार्‍या चौकशी समितीमध्ये हिंदुत्वनिष्ठांनाही सहभागी करून घेण्यात यावे.

४. गेल्या ५ वर्षामध्ये हिंदूंच्या विरोधात झालेल्या दंगलींमधील पीडितांचे पुनर्वसन, त्यांना देण्यात येणार्‍या साहाय्यता निधीची योग्यता-अयोग्यता आणि त्याची प्रत्यक्ष झालेली कार्यवाही यांच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली जावी. त्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार दंगल पीडितांना साहाय्यता निधी दिला जावा.

५. दंगलीच्या काळात ज्या हिंदूंची घरे नष्ट झाली आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.

६. दंगलीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दिलेल्या निधीचाही आढावा घेतला जावा.

७. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत झालेल्या दंगलीमध्ये मृत झालेल्या मुसलमानांसाठी त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या साहाय्यता निधीमधील जो सर्वाधिक साहाय्यता निधी असेल, तेवढा निधी मृत हिंदूंच्या नातेवाईकांना देण्यात यावा.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हे सर्व ठराव ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम ।’च्या जयघोषात आणि हात उंचावत पारित केेले.

उद्बोधन सत्र : जिहादी आतंकवाद आणि धर्मांधां पासून हिंदूंचे रक्षण

१. हिंदूंच्या सतत संपर्कात राहून त्यांना वैचारिक स्तरावर मजबूत करायला हवे ! – श्री. जीतेंद्र ठाकूर

२. दंगलीच्या वेळी हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु युवकांचे ‘सुरक्षा दल’ स्थापन करायला हवे ! – श्री. प्रशांत जुवेकर

३. हिंदूंनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या स्तरावर संघटन करणे आवश्यक ! – डॉ. नील माधव दास

४. हिंदु राष्ट्र येईपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

५. श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी व्यक्त केलेली बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येची वास्तव भीषणता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *