‘हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात वैध मार्गाने कार्य कसे करावे’, याविषयी अनुभव श्री. जीतेंद्र ठाकूर यांनी सांगितले . . .
१. मध्यप्रदेशमध्ये एका जिल्ह्यात एका युवकाने शिवपिंडीवर पाय ठेवून उभे राहिल्याचे चित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. हे पाहून धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी सनदशीर मार्गाने विरोध करत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. त्याचा सामाजिक संकेतस्थळांद्वारे प्रसार केला. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर प्रसार होऊन त्या युवकाला अटक झाली.
२. भोपाळमध्ये मुसलमानांनी ‘होली बेस’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुसलमानांनी हिंदूंच्या सणांचा कार्यक्रम आयोजित करणे, हेच अयोग्य आहे. त्याद्वारे त्यांचे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र होते. त्यानंतर विविध स्तरांतील पोलीस अधिकार्यांना निवेदन देणे आणि लोकप्रतिनिधींनी दबाव आणून मुसलमानांना तो कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले.
३. हिंदूंना हिंदुत्वाविषयी सांगणारे कोणी नाही, ते सांगणारे हवेत.
४. हिंदूंनी सतत एकमेकांच्या संपर्कात असायला हवे. त्यांना वैचारिक रूपाने मजबूत करायला हवे.