Menu Close

(म्हणे) हिंदु दहनसंस्कार पर्यावरणासाठी घातक !

अग्नितत्त्वाचे महत्त्व ज्ञात नसलेले राष्ट्रीय हरित लवाद !

हिंदु दहन संस्कार नव्हे, तर विज्ञानच पर्यावरणासाठी घातक ठरल्याने पृथ्वीच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे !

नवी देहली : राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा. लवादाने लाकूड जाळून दहन संस्कार करण्याला, तसेच नदीत अस्थींचे विसर्जन करण्याला पर्यावरणदृष्ट्या घातक ठरवले आहे. लवादाच्या या सूचनेचा हिंदुत्ववादी ओजस्वी पार्टीने विरोध केला आहे. (प्रतिदिन रासायनिक कारखान्यांतून सोडला जाणारा धूर, नदीत सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी यांमुळे किती प्रदूषण होते आणि दहनसंस्कारामुळे किती कथित प्रदूषण होते, हे राष्ट्रीय हरित लवादाने जनतेसमोर मांडले पाहिजे. – संपादक) न्यायाधीश यू.डी. साल्वी यांच्या नेतृत्वाखालील लवादाच्या पिठाने म्हटले आहे की, लोकांची विचारधारा पालटण्याची आणि विद्युत शवदाहिनी, सीएन्जी आदींचे पर्यावरण अनुकूल पद्धतीने अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. हे प्रकरण श्रद्धेचे असल्याने धार्मिक नेत्यांकडे याचे दायित्व आहे की, त्यांनी लोकांना श्रद्धेच्या विचारधारेतून पर्यावरण अनुकूलतेकडे वळवावे. अधिवक्ता डी.एम्. भल्ला यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली. यात त्यांनी दहन संस्कारामुळे वायूप्रदूषण होत असल्याने त्याला पर्याय निर्माण करावा, असे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *