श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद’ अर्थात ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासद्रोहाविरुद्ध लढा देऊन ‘ब्रेनवॉश रिपब्लिक’ या पुस्तकाचे लिखाण करणारे श्री. मुनीश्वर सागर म्हणाले की, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या माध्यमातून खोटे लिखाण करणे, संस्कृतद्वेष पसरवणे, आर्य-अनार्य हा विघटनवादी सिद्धांत मांडणे, हिंदु राष्ट्रपुरुषांची माहिती न देणे, आक्रमकांचा उदोउदो करणे, महिलांच्या अवमानास हिंदु धर्माला कारणीभूत मानणे यांद्वारे अपप्रचार केला जातो. त्यामुळे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या विरुद्ध आम्ही १ सहस्र १०० पानांची याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रविष्ट केली. त्याचे उत्तर देण्यास न्यायालयाने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ला आदेश दिले; मात्र १ वर्षानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने आमच्या केवळ सुधारणा मागवून घेतल्या आहेत. म्हणजे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ हिंदूंच्या धर्मभावनांना कस्पटाचेही मूल्य देत नाही !