‘दंगलीच्या वेळी हिंदूंची आवश्यक सिद्धता आणि जिहादी आतंकवादापासून हिंदूंचे रक्षण’, याविषयी मार्गदर्शन करतांना श्री. प्रशांत जुवेकर यांनी सांगितले की . . .
१. दंगल ही केवळ दंगल नसून ते देशाच्या विरोधात पुकारलेले युद्धच आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानी सैनिक सीमेवर सैन्याशी द्वेषाने लढतो, त्याप्रमाणेच धर्मांध शस्त्र आणि द्वेष भावनेने तोडफोड अन् हानी करणारी दंगल करतात. दंगल ही समाज आणि अर्थव्यवस्था यांना खिळखिळे करणारे षड्यंत्र आहे. त्यामुळे दंगलींच्या विरोधात ठोस उपाययोजना हवी.
२. दंगलीच्या वेळी धर्मांध श्रद्धास्थानांची विटंबना करत महिलांवर अत्याचार करत असतात आणि हे सर्व १०० कोटी हिंदू बघत असतात; कारण हिंदू समाज शस्त्रविहीन आहे आणि सतर्क नाही. अशा वेळी प्रतिकाराविना मरण पत्करणे आणि दौर्बल्य दाखवणे, हे महापाप आहे. आपले ऋषि, देवता आणि राजे यांनी शौर्याची पूजा केली. हिंदूंनी स्वरक्षणार्थ सामर्थ्यवान व्हायला हवे.
३. दंगलीला सामोरे जाण्यासाठी आपण आतापासून सतर्क राहून स्वरक्षण शिकले पाहिजे. आपण आपला स्वाभिमान जागृत करून समाजातील हिंदूंमध्ये शौर्याची भावना जागृत केली पाहिजे. दंगलीच्या वेळी हिंदु युवकांचे ‘सुरक्षा दल’ स्थापन करायला हवे.
४. ज्या भागात हिंदू अल्पसंख्य आहेत, त्या भागात दंगली होतात. अशा ठिकाणी अन्यत्रच्या किंवा जवळच्या हिंदूंनी साहाय्य करण्यासाठी जायला हवे.
५. दंगलीच्या वेळी महिलांनीही सतर्क राहून वेळप्रसंगी प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी महिलांनीही स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकले पाहिजे.