श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात झारखंडमधील मुसलमानबहुल भागातील हिंदूंच्या रक्षणार्थ केलेल्या कार्याविषयी डॉ. नील माधव दास यांनी सांगितले की, जोपर्यंत हिंदूसंघटन प्रभावशाली होत नाही, तोपर्यंत धर्मांध दबले जात नाहीत.
सद्यस्थितीत पोलीस आणि प्रशासन हे दोन्हीही हिंदूंच्या विरोधात कार्य करत आहेत. मुसलमान राजनीती, आर्थिक आणि सामाजिक या तिन्हीदृष्ट्या सबळ असल्याने ते प्रशासनावर दबाव आणतात. त्याचप्रमाणे हिंदूंनी वरील तीनही प्रकारे संघटन करणे आवश्यक आहे.