हिंदुद्रोही कृत्य करणार्या अधिवक्त्याच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार्या हिंदूंचे अभिनंदन !
सीतामढी (बिहार)/ अयोध्या : प्रभु श्रीरामावर खटला प्रविष्ट करणारे चंदनकुमार सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्यामुळे तीन खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी धार्मिक संघटनांनी चंदन सिंह यांचा विरोध चालू केला आहे. जिल्हा अधिवक्ता संघानेही अधिवक्ता चंदन सिंह यांची सनद रहित करण्याची मागणी केली आहे. १ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयाने चंदन सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर ती अव्यवहारिक ठरवून फेटाळली होती. (अधिवक्ता चंदन सिंह यांना विरोध करणार्या हिंदु संघटनांचे तसेच जिल्हा अधिवक्ता संघाचे अभिनंदन ! मुळात चंदन सिंह यांना न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याच्या प्रकरणी न्यायालयानेच दंड देणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटत आहे ! – संपादक)
भगवान रामावर खटला प्रविष्ट करणे, हे मोठे षड्यंत्र ! – संतसमाज
अयोध्येतील संतांनीही या घटनेवर टीका केली आहे.
१. येथील महंत कमल नयन दास महाराजांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदूंच्या विरोधात यापूर्वीही षड्यंत्र रचले जात होते आणि आताही रचले जात आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.
२. दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास महाराज म्हणाले की, खटला प्रविष्ट करणार्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला प्रविष्ट केला पाहिजे.
३. शनिधाम संस्थापक स्वामी हरिदयाल शास्त्री, चौबुर्जी येथील महंत बृजमोहन दास आणि गुजराती पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत कमला दास व्यास यांनीही कठोर कारवाईची मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात