अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांनी ‘कर्नाटक राज्यात चालू असलेल्या जिहादी कारवाया आणि हिंदूंसमोरील समस्या’ याविषयी बोलतांना सांगितले की . . .
१. जिहाद करण्याचे अनेक प्रकार असून त्यात ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या आहे. केरळमध्ये तटावरील क्षेत्रामध्ये अनेक मुली बेपत्ता होत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. त्यासाठी अरब देशांतून पैसे दिले जातात.
२. सध्याच्या पालकांनी स्वतःच्या पाल्याचे भ्रमणभाष, ‘फेसबूक’ आणि अन्य सामाजिक संकेतस्थळांवरील खाती पडताळून घ्यायला हवीत. अनेक पाल्य ‘लव्ह जिहाद’मध्ये ओढले गेल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालयांमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी जागृत केले जात आहे. अनेक युवतींना न्यायालयाच्या आदेशाचे साहाय्य घेऊन त्यापासून वाचण्यासाठी समुपदेशन केले जात आहे.
३. कर्नाटकमध्ये प्रतिदिन हिंदू कार्यकर्त्यांची हत्या करणे चालू आहे. ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेने केरळ राज्यात एका वेगळ्या नावाने नवीन संघटना चालू केली आहे.
४. कर्नाटकमध्ये येत्या २ वर्षांत निवडणूक होणार असून त्या वेळी आम्ही ‘जो हिंदूहिताला साहाय्य करेल, त्यालाच निवडून देऊ’, असा प्रचार करणार आहे.
५. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांतील मुसलमानांनी पूजा करणे, साडी नेसणे अशा हिंदू परंपरा चालू केल्या आहेत. त्या मुसलमानांचे निजामाच्या काळात धर्मांतर केले होते. आता ते ‘घरवापसी’ करणार असून त्यांचे आम्ही समर्थन करतो.
६. हिंदु राष्ट्र येईपर्यंत आमचा संविधानिक मार्गाने लढा चालूच रहाणार आहे.
अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी. यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि समिती यांविषयी काढलेले कृतज्ञतापर उद्गार !
वरील मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून मी हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आहे. त्यापूर्वी गेली २५ वर्षे मी ‘कम्युनिस्ट’ पक्षात होतो. सध्या जेव्हा कम्युनिस्टांमध्ये अंतर्गत चर्चा होते, त्या वेळी त्यांच्या अनेक चर्चांमध्ये माझे नाव येते आणि ‘एक दिवस तुमची हत्या केली जाईल’, असेही सांगतात. असे असतांनाही मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे.