श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी बांगलादेशी घुसखोरीच्या समस्येची वास्तव भीषणतेची जाणीव करुन देताना सांगितले की . . .
१. देशात सर्वाधिक घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांच्यासाठी नोकरी, स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), मतदान ओळखपत्र अशा अनेक सुविधा बनवून देण्यासाठी दलाल तात्काळ सिद्ध असतात. शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना आणि सुविधा त्यांच्यासाठी लागू केल्या जातात. अशा प्रकारे घुसखोरी करणारे हे केवळ देश लुटण्यासाठीच आलेले असतात.
२. याउलट बांगलादेशी हिंदू हा देशात आश्रयासाठी येतांना वैध मार्गाने येतो; परंतु त्याची नोंद ही ‘बांगलादेशातून आलेला’ अशी असते. त्यामुळे त्याला देशाचे नागरिकत्व लवकर मिळत नाही.
३. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात शरणार्थींना सर्वाधिक सुविधा दिल्या जातात.
४. येणार्या काळात देशाचा पंतप्रधान कोण असेल, याचा निर्णय बांगलादेशी घुसखोर ठरवतील, अशी भयावह स्थिती निर्माण होईल.
५. देशात बांगलादेशी घुसखोर किती आहेत, याची आकडेवारी शासनही देऊ शकत नाही. असे घुसखोर देशभर पसरलेले असून त्यांना या देशातून हाकलणे सोपे नाही.
६. ही समस्या वाढती आणि गंभीर असून ते उद्या स्वतःचा एक वेगळा देश मागू शकतात.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी काढलेले गौरवोद्गार
हिंदू अधिवेशनाचे वटवृक्षात रूपांतर होत आहे !
अखिल भारतीय हिंदू अधिवेशन जेव्हा पहिल्यांदा आयोजित केेले होते, त्या वेळी ५ हून अधिक राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होत्या. आताचे अधिवेशन हे देश-विदेशातील १३२ हून अधिक संघटनांनी एकत्रित येऊन आयोजिले आहे. याद्वारे अधिवेशनाचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वांना एकत्र करून हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. अधिवेशनात आलेल्या प्रत्येकाला हिंदु राष्ट्र आणणे आणि त्याचा प्रसार करणे यांचे दायित्व पार पाडावे लागणार आहे. प्रत्येकाने हिंदु धर्माचा ध्वज सातासमुद्रापलीकडे जाऊन फडकवायचा आहे.