अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जूनला सकाळी ‘धर्मनिरपेक्षतेची निरर्थकता’ या विषयावर बोलतांना डॉ. नील माधव दास यांनी सांगितले की . . .
१. निधर्मीवादाच्या नावाखाली पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि दक्षिणेतील काही राज्ये येथे मुसलमान राजकीयदृष्ट्या मुख्य भूमिका निभावत आहेत.
२. देशामध्ये शेतकर्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे. मुसलमानांना दिल्या जाणार्या या सुविधा केंद्रात भाजप शासन आल्यावर न्यून होतील, असे वाटले होते; परंतु तसे न होता त्या सुविधांमध्ये वाढ झाली. याचे कारण म्हणजे निधर्मीवाद !
३. निधर्मीवादाच्या काळात ‘हिंदू’ म्हणणे ‘जातीयवादी’ होत चालले आहेत.
४. निधर्मीवाद घातक असून त्याद्वारे मुसलमान, ख्रिस्ती आणि साम्यवादी एकत्र आले आहेत. त्याद्वारे ते सवलती आणि सुविधा लुटत आहेत. हे तिघेही स्वतःची शक्ती वाढवून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र रचत आहेत.
५. निधर्मीवादाच्या नावाखाली ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्याचा प्रयत्न असून आपल्या सर्वांना ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. सध्याच्या काळात साम्यवादी आणि निधर्मी या दोन्ही शब्दांना कोणताही अर्थ राहिलेला नाही.
डॉ. नील माधव दास यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतीचा भाव
उद्बोधन सत्रामध्ये डॉ. नील माधव दास यांनी मार्गदर्शनाला प्रारंभ करतांना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी नमस्कार करून मार्गदर्शनाला आरंभ करतो’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले.