विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले कि, भविष्यकथनाच्या प्रचलित विविध पद्धतींपैकी एक असलेल्या नाडीभविष्यात म्हटले आहे की, येणार्या काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडेल. नैसर्गिक आपत्ती किंवा अराजकासारखी स्थिती एकाच वेळी निर्माण होईल. अशा आगामी भीषण काळात आपल्याला धर्मबंधुत्वाच्या नात्याने हिंदूंच्या साहाय्यार्थ उभे रहावे लागेल. जनतेला संकटसमयी आधार दिला, तरच त्यांचा विश्वास संपादन करणे हिंदू संघटनांना शक्य होईल आणि पुढे जनतेला हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील करता येईल. त्यामुळे भारतात कुठेही आपत्ती आली, तरी आपल्याला हिंदूंना संघटितपणे साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपत्तींचा सामना कधी करावा लागेल, ही वेळ सांगून येत नाही. त्यामुळे अशा काळात धर्मबंधूंना संघटित साहाय्य करण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारतात कुठेही आपत्ती आली, तरी आपण सर्व संघटनांनी धर्मबंधूंच्या साहाय्यासाठी संघटितपणे कार्य करायचे आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील जलप्रलयाच्या वेळी ३ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी, तर नेपाळमध्ये भूकंपाच्या वेळी भारतातील ५ आणि नेपाळमधील ५ संघटनांनी एकत्र येऊन साहाय्यकार्य केले होते. एखाद्या वेळी अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्याला सर्व प्रकारची सिद्धता ठेवावी लागेल.