विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : ‘अन्य धर्मियांकडून होणारी वैश्विक हानी आणि विश्व कल्याणासाठी हिंदु धर्माची आवश्यकता’, या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी सांगितले की . . .
१. येत्या काळात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता असून ‘ते पाण्यामुळे होईल’, असे म्हटले जाते; पण त्याच पाण्याची पूजा करणे, गोमाता, पर्यावरण आणि सर्व प्राणीमात्रांची पूजा करणे हे सर्व हिंदु धर्माने शिकवले आहे. त्यामुळे भारतियांकडे या सर्व गोष्टींची कमतरता नाही. ही शिकवण अन्य राष्ट्रांना देण्याची आवश्यकता आहे. अनेक विदेशी विचारवंत आजही भारताकडे आशेने पहात म्हणत आहेत की, हिंदुत्वच जगाला वाचवू शकते.
२. आपल्या धर्माने अनादी काळापासून नारीपूजा आणि कन्यापूजन करण्यास शिकवले. याउलट विदेशात महिलांना मतदानाचा अधिकार १९ व्या शतकात मिळाला आहे. यावरून भारतीय आणि पाश्चात्य संस्कृती यांमधील भेद लक्षात येईल.
३. पर्यावरण वाचवण्याचा संदेश पूर्वीच्या काळी राजामहारांच्या काळापासून देण्यात येत असून प्रसंगी त्यासाठी बलीदानही दिले आहे. जगभरामध्ये पर्यावरणाची हानी अन्य धर्मियांमुळे झाली आहे; कारण विदेशी नागरिकांनी निसर्ग ही उपभोग घेणारी वस्तू असे समजून तिचा वापर करून नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट केली, तर भारतियांनी निसर्गाचे संवर्धन केले आहे. आपल्या धर्माने पर्यावरणाची हानी रोखण्यास शिकवले आहे. त्यामुळे आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे.
४. आज अनेक देश हे भारताकडे पृथ्वीला वाचवण्याचे आवाहन करत आहेत.
५. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका येथे हिंदु राष्ट्र झाल्यास येथील सर्व समस्या संपलेल्या असतील.