विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : हिंदु अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात मरवनपुलावू सच्चिदानंदन, श्रीलंका, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले आणि ‘भारत रक्षा मंच’चे श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी मार्गदर्शन केेले.
यावेळी सनातन-निर्मित ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन
क्षणचित्रे
१. हिंदु जनजागृती समितीविषयी अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांचे गौरवोद्गार बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी आम्ही कार्य करत असून त्यासाठी हिंदु जनजागृती समिती पाठिंबा अन् प्रेरणा देते. त्यांच्या सदिच्छा आमच्या सदैव पाठीशी आहेत. परात्पर गरु डॉ. आठवले यांचेही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत.
२. श्री. सच्चिदानंदन म्हणाले की, माझे वय आता ७६ वर्षे आहे आणि मी कधीही जगाचा निरोप घेऊ शकतो; मात्र ‘मला हिंदूंच्या उद्धारासाठी हिंदु राष्ट्र आले पाहिजे’, असे वाटते. या वेळी उपस्थितांनी घोषणा दिल्या की, ‘रामनाम सब गायेंगे, हम सब लंका जाएंगे ।’
३. श्रीलंकेतील हिंदूंसाठी कार्यरत असणार्या १ सहस्र कार्यकर्त्यांची ‘तमिळी शिवसेना’ करत असलेल्या कार्याचा उल्लेख श्री. सच्चिदानंदन यांनी केला आणि ‘हिंदु तमिळीळम्’ हा शिवसेनेने बनवलेला ग्रंथ घेण्याचे सर्वांना आवाहन केले.
४. श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी ‘श्रीलंकेत जाण्यासाठी माझे नाव पहिल्या क्रमांकावर असेल’, असे त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले.