विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : १५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे (‘एस्.एस्.आर्.एफ्’चे) कार्य आणि धर्मांधांकडून आलेल्या धमक्या’ या विषयावर बोलतांना ‘‘एस्.एस्.आर्.एफ्’चे पू. सिरियाक वाले म्हणाले की, जगभरातील १० लक्ष सर्वपंथीय जिज्ञासू ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळाला भेट देतात. पूर्वी २२ भाषांत असलेले हे संकेतस्थळ आता मात्र केवळ २० भाषांत आहे; कारण एका देशातील धर्मांधांनी आमच्या साधकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांनी ‘इसिस’च्या आतंकवाद्यांचे छायाचित्रही पाठवले होते. यापूर्वीही दोन वेळा दोन भाषांतील संकेतस्थळांवर या देशात प्रतिबंध घालण्यात आला होते. या देशात ४० साधक साधना करत होते, २ साधक धर्मप्रसार करू इच्छित होते; मात्र या धमक्यांमुळे आता त्यांची साधना बंद पडली आहे. धर्मप्रसाराचे मोठे कार्य ठप्प झाले आहे. असे असले, तरी परिस्थितीकडे आम्ही मात्र शिकण्याच्या दृष्टीने पहात आहोत. कितीही अडथळे आले, तरी हिंदु धर्माचा सूक्ष्मातील तेजोमय परिणाम कुणीही थांबवू शकणार नाही, अशी आमची श्रद्धा आहे.
हिंदु धर्मप्रसाराच्या कार्याचा तेजोमय परिणाम कुणीही थांबवू शकणार नाही ! – पू. सिरियाक वाले, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’
Tags : राष्ट्रीय हिंदु आंदोलनहिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंच्या समस्या