विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : १५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार आणि उपाय’ या विषयावर बोलतांना ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांनी सांगितले की, बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू लढले. त्या बदल्यात त्यांना काय मिळाले ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर तेथील शासनाने संविधानामध्ये इस्लाम धर्मानुसार आचरण करण्याचे कलम घुसडले. तेव्हापासून तेथील हिंदूंना सातत्याने त्यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार नाकारला जात आहे. तेथील हिंदूंना कुठलाही न्याय वा अधिकार मिळत नाही, उलट हिंदूंच्याच सर्व भूमी बळजोरीने लाटल्या गेल्या. हिंदू मुलींचे अपहरण करून अत्याचार केले जातात. एका हिंदू शिक्षिकेला एका स्थानिक राजकीय नेत्याने भर चौकात अयोग्य पद्धतीने वागणूक देत अपमानित केले. शाळेतील हुशार हिंदू विद्यार्थ्यांना मारण्यात येते. आतापर्यंत बांगलादेशमधील ३ सहस्र ३३६ मंदिरे तोडली गेली आहेत. अशा विविध प्रकारे हिंदूंवर अत्याचार आणि अन्याय केला जात असून त्या प्रत्येक घटनेच्या विरोधात ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ लढा देत आहे. हिंदु धर्म आणि हिंदू समाज यांच्यावर अन्याय करणारा कोणीही असो, त्याला न्याय देण्यासाठी न्यायालयात जाण्याची आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आमची सिद्धता आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली ! – अधिवक्ता श्री. रवींद्र घोष, बांग्लादेश माइनॉरिटी वॉच, बांग्लादेश
Tags : अंतरराष्ट्रीयबांगलादेश मायनॉरिटी वॉचहिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंच्या समस्या