विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाचा विषय हाताळण्यात आला. या कार्यात १३७ संघटना जोडल्या गेल्या. हे अभियान यशस्वी केल्यानंतर आम्हाला असे वाटते की, एक भारत अभियान हे आता प्रत्येक हिंदुच्या घरापासूनच चालू झाले पाहिजे. त्यानंतर त्याची व्याप्ती गल्ली, प्रांत, जिल्हा, राज्य अशा पद्धतीने वाढवत नेली पाहिजे. त्यामुळे जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल खच्ची होऊन देशभरात ठिकठिकाणी निर्माण होत असलेली काश्मीरसदृश स्थिती रोखली जाऊ शकते. ‘पनून कश्मीर’(आपले काश्मीर)ची स्थापना हाच ‘हिंदु राष्ट्रा’चा प्रारंभ असणार आहे. गेल्या वर्षभरातील अभियानामुळे हिंदूंच्या जनमताचा ध्वनी केंद्रशासनापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ला मान्यता द्यावीच लागेल. गेल्या ७०० वर्षांत काश्मीरमधून हिंदूंना ७ वेळा हाकलण्यात आले; मात्र तरीही आपण गर्वाने सांगतो की, आम्ही हिंदू आहोत ! आज देशातील हिंदू आम्हाला ‘आम्ही काश्मिरी हिंदूंसमवेत आहोत’, असे आश्वसकपणे सांगतात. याचे सर्व श्रेय हिंदु जनजागृती समितीचे आहे. असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.
केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर
Tags : काश्मीर प्रश्नपनून कश्मीरराष्ट्रीयहिंदु अधिवेशनहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंच्या समस्या
0 Comments