विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : धर्मांधांनी अफगाणिस्तान घेतले, पाक घेतले आता ते काश्मीरमधून हिंदूंना तर मागे ढकलू पहात आहेतच; पण देहलीतही येऊ पहात आहेत. हा जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी केंद्रशासित प्रदेश म्हणून ‘पनून कश्मीर’ची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून काश्मीर’ चे उपाध्यक्ष श्री. राहुल राजदान यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.
श्री. राजदान पुढे म्हणाले की . . .
१. काश्मीर खोर्यातून वर्ष १९९० मध्ये साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना हाकलण्यात आले. काश्मीरमधील तेव्हाच्या आणि आताच्या धर्मांधांची मनःस्थिती यांत मोठा भेद दिसून येतो.
२. तेव्हाच्या धर्मांधांना ‘काश्मिरी हिंदूंना देशभरातील हिंदू पाठिंबा देतील’, ही भीती होती. ती आता राहिलेली नाही.
३. तेव्हाचे धर्मांधांचे नेते राजकीय अन्यायापोटी हाती बंदूक घेतल्याचे सांगत होते; मात्र आताचे नेते ‘काश्मीरची लढाई’ ही ‘इस्लामसाठीची लढाई’ असल्याचे उघडपणे सांगतात. एवढेच नव्हे, तर काश्मीरच्या समस्येला ‘राजकीय समस्या’ समजणार्या फुटीरतावाद्यांनाही ठार करण्याच्या धमक्या दिल्या जातात.
४. काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या कह्यात असणारीच मंदिरे शिल्लक आहेत. तेथे धर्मांधांची कट्टरता वाढली आहे. तेथील मूळ काश्मिरी भाषा नामशेष करून ‘उर्दू’ भाषा रूजवण्यात येत आहे.
५. तथापि काश्मीरमध्ये जर कशातच पालट झाला नसेल, तर तो म्हणजे तेथील सरकारचा दृष्टीकोन ! तेथील सरकार पूर्वीप्रमाणेच आजही धर्मांधांच्या पाठीशी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी ‘पनून कश्मीर’ची निर्मिती आवश्यक आहे.