विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदूंसमोर लव्ह जिहाद आणि धर्मांतर या २ मोठ्या समस्या आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठी कायद्याचा प्रभावी वापर, हिंदूंना धर्मशिक्षण देणे, धर्मांतरितांचे शुद्धीकरण करणे, हे मार्ग आवलंबावे लागतील, असे सार येथे चालू असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रातील सहभागी वक्त्यांनी मांडले.
वक्त्यांनी मांडलेले विचार . . .
४. धर्मांतरितांचे शुद्धीकरण करण्यावरही भर देणे आवश्यक ! – श्री. नागेश गाडे, हिंदु जनजागृती समिती
सत्रात संमत करण्यात आलेले ठराव
१. केंद्र शासनाने सर्व राज्यांना लागू होणारा धर्मांतरबंदी कायदा करावा.
२. वनवासी क्षेत्रात ख्रिस्ती मिशनर्यांना अनाथालय, तसेच अन्य कोणतेही सेवाकार्य करण्यास प्रतिबंध करावे.
क्षणचित्रे
१. या वेळी उपस्थितांनी ‘स्वामी श्रद्धानंद की जय हो, प.पू. भाऊ मसुरकरकी जय हो, मनु महाराज की जय हो’, अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या.
२. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करून केला.