विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदूविरोधी विचारधारा ही आताच सिद्ध झाली आहे, असे नाही तर चार्वाक काळापासून ही विचारधारा चालू आहे. इस्लाम, ख्रिश्चन यांच्या माध्यमातून हिंदु विचारधारेवरील आक्रमणे अधिकच गडद झाली. बहुंख्य हिंदू असलेला मलेशिया आज मुस्लीमबहुल आहे. भारतातील हिंदूंनी धर्मांधांचा धोका वेळीच न ओळखल्यास वर्ष २०५० मध्ये भारताची स्थितीही मलेशियाप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन पुणे येथील हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान चे अधिवक्ता देवदास शिंदे यांनी केले. ते १५ जून या दिवशी झालेल्या ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.